‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !
१. सद्गुरु सिरियाकदादांनी सर्व सेवा व्यवस्थित सांभाळून इतरांना वेळ देणे, तसेच घरातील कामांत साहाय्य करणे
‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत पू. सिरियाकदादा (आताचे सद्गुरु) पुण्याला आमच्या घरी काही दिवस रहायला आले होते. त्या वेळी ते नेहमी ‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर आमचे ‘एक कुटुंबीय’ म्हणून रहायचे. त्यांचे ‘ऑनलाईन सत्संग’ आणि अन्य सेवा पूर्णपणे सांभाळून ते घरातील सदस्यांसारखे सर्वांशी बोलायला आणि घरातील कामांत साहाय्य करायला वेळ द्यायचे.
२. रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतांना मुलाला काही अडचणी आल्यास सद्गुरु सिरियाकदादांशी बोलल्यावर त्याच्या मनाचे समाधान होणे
माझा मुलगा डॉ. उज्ज्वल वर्ष २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागला. आरंभी त्याला आश्रमजीवन पुष्कळ नवीन होते. त्यामुळे त्याला अडचणी यायच्या, तसेच त्याच्या मनात काही प्रश्नही असायचे. तेव्हा मी त्याला पू. सिरियाकदादांशी बोलायला सांगायचो. पू. सिरियाकदादांना आमच्या घरातील सर्वांच्या प्रकृतींची पूर्ण ओळख असल्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर उज्ज्वलच्या मनाचे लगेच समाधान व्हायचे. पू. दादा त्याला मानसिक आणि आध्यात्मिक (नामजप इत्यादी) अशा दोन्ही स्तरांवर सांगायचे.
३. सौ. योयाताई यांच्यामध्ये कुटुंबभाव असणे
सौ. योयाताई घरी असतांना काही वेळा विदेशी पदार्थ बनवायच्या. भारतीय पदार्थ शिकण्याकडेही त्यांची ओढ असायची. तेव्हा त्या ‘तुम्ही सर्व जण आमचे कुटुंबच आहात’, (You are my family.)’, असे म्हणायच्या आणि तसेच वागायच्या.
पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
– श्री. प्रताप कापडीया, पुणे, महाराष्ट्र. (१५.८.२०१८)