… तरच सिंधुदुर्गचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश होईल ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सावंतवाडी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल या दिवशी सर्व उत्तरदायी अधिकार्यांनी कार्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक होते; पण आतापर्यंत जे सेवेत रुजू झाले नाहीत, अशा अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाईल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाला रुग्णालयातून सोडल्यानंतर २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे, तसेच त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित करता येऊ शकतो, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या वेळी सांगितले.