‘आदित्यहृदय स्तोत्र’ ऐकल्यावर श्वसनाचा होणारा त्रास आणि जाणवणारी अस्वस्थता दूर होणे
‘२०.११.२०१९ या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला अकस्मात् श्वसनाचा त्रास होऊ लागला. मला दम्याचा त्रास असल्यामुळे ‘हा त्रास दम्यामुळे होत आहे’, असे मला वाटले; मात्र या वेळी मला थकवा आणि वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. मी अत्तर कापराचे उपाय करणे, पाचही बोटे एकत्र करून मुद्रा करून शिवाचा जप करणे आदी उपाय करत होते. तेव्हा मला काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘छातीवर दाब जाणवणे, श्वास घेतांना त्रास होणे, अस्वस्थ वाटणे, छातीत कळा येणे, यांसारखे त्रास होत असल्यास नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्यासह ‘आदित्यहृदय स्तोत्र’ ऐकावे’, असे छापून आल्याचे आठवले. मी सनातन संस्थेच्या ‘अॅप’वरील ‘आदित्यहृदय स्तोत्र’ लावले. हे स्तोत्र ७ वेळा ऐकल्यानंतर मला होणारा श्वसनाचा त्रास आणि जाणवणारी अस्वस्थता दूर झाली.
प.पू. गुरुदेवांनी या कलियुगात त्रासाशी लढून साधना सहजतेने होण्यासाठी इतके उपाय आणि इतकी माध्यमे सहजतेने उपलब्ध करून दिली आहेत, त्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी साधना या जिवाकडून होऊ दे, ही तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक