सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांचे सूक्ष्मातील प्रयोग
चैत्र पौर्णिमा (८.४.२०२०) या दिवशी असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने…
१. मारुतीचे २७.५ टक्के मारुतितत्त्व असलेले चित्र
१ अ. मारुतीच्या चित्राकडे पहाणे
१. प्रयोगाच्या आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.
२. मी मारुतीच्या चित्राकडे पाहू लागल्यावर मला ‘त्याच्याकडून शक्तीची स्पंदने येत आहेत’, असे जाणवले. मला प्रथम अज्ञाचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. पुढील ५ मिनिटे मला केवळ तेथेच स्पंदने जाणवत होती.
३. त्यानंतर मला माझ्या अनाहतचक्रावर शक्तीची स्पंदने जाणवू लागली. तेथून पुढे आणखी कोणत्याही चक्रावर स्पंदने जाणवली नाहीत.
४. मारुती हा आसुरी शक्तींपासून आणि कोणत्याही भयापासून मनुष्याचे रक्षण करणारा आहे. तो जसा बलशाली आहे, तसाच तो बुद्धीवंत आणि चतुरही आहे. तो भक्तीमध्येही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे हे सर्व गुण आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांच्याशी संबंधित अन् शक्तीशी निगडित आहेत; म्हणून मला त्या चक्रांवर शक्तीची स्पंदने जाणवली.
५. मी मारुतीच्या स्पंदनांना पूरक अशी मुद्रा शोधल्यावर ती ‘दोन्ही हातांचे तळवे मांडीवर उपडे ठेवणेे’ ही निर्गुण स्तराची मुद्रा आहे. ‘दोन्ही हातांचे तळवे मांडीवर उपडे ठेवणे’ ही मुद्रा केल्यावर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली आणि मारुतीची स्पंदने सर्व चक्रांवर जाणवू लागली. तसेच मला जाणवत असलेल्या शक्तीच्या स्पंदनांचे रूपांतर प्रथम चैतन्यामध्ये आणि नंतर आनंदामध्ये झाले. केवळ उजव्या हाताने मुद्रा केली, तरी मला तशीच स्पंदने जाणवली; पण तेव्हा स्पंदने जाणवण्याची गती धिमी होती.
६. त्यानंतर पुढे स्पंदनांमध्ये काही पालट न झाल्यामुळे मी प्रयोग थांबवला.
७. प्रयोगाच्या आरंभी माझ्या नाडीचे ठोके ५४ होते. प्रयोगानंतरही ते तेवढेच होते.
१ आ. ‘हं हनुमते नमः ।’ आणि ‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपांतील अन् मारूतीच्या चित्रांतील स्पंदने
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार देवतेच्या नामजपामध्ये शब्द आहेत, तिथे तिच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात.
१ आ १. ‘हं हनुमते नमः ।’ हा नामजप करणे
१ आ १ अ. ‘हं हनुमते नमः ।’ या नामजपाची स्पंदने वर्ष २००७ मध्ये रेखाटलेल्या सनातन-निर्मित मारुतीच्या चित्रातील स्पंदनांशी तंतोतंत जुळणे : ‘हं हनुमते नमः ।’ या नामजपाच्या प्रयोगामध्ये जाणवलेली स्पंदने मारुतीच्या चित्राकडे पाहून केलेल्या प्रयोगातील स्पंदनांशी अगदी तंतोतंत जुळली. स्पंदनांचा जाणवलेला क्रम, तसेच पूरक मुद्रा आणि तिच्यामुळे जाणवलेली स्पंदने हेही सारखेच होते, त्यामुळे सनातन-निर्मित मारुतीच्या चित्रावर ‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपाच्या ऐवजी ‘हं हनुमते नमः ।’ हा नामजप लिहिणे आवश्यक आहे. मारुतीच्या सर्व अवयवांकडे पाहून शक्ती जाणवली. ‘हं हनुमते नमः ।’ हा नामजप केल्यावर नामजपातील ‘हं’ या बीजमंत्राच्या उच्चारातून मारक शक्ती कार्यरत होऊन देहात उष्णता निर्माण होत असल्याचे जाणवते. ही स्पंदने वीरमारुतीच्या रूपाला अधिक जुळतात. त्यामुळे त्यातून शक्तीची स्पंदने अधिक प्रक्षेपित होतात.
१ आ १ आ. ‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपाची स्पंदने वर्ष नोव्हेंबर २०१२ मध्ये रेखाटलेल्या सनातन-निर्मित मारुतीच्या चित्रातील स्पंदनांशी तंतोतंत जुळणे : वर्ष नोव्हेंबर २०१२ मध्ये रेखाटलेल्या सनातन-निर्मित मारुतीच्या चित्रातील मारुती हा भक्तवत्सल भावामध्ये आणि आशीर्वाद मुद्रेमध्ये असल्यामुळे त्याच्याकडे पाहून ‘हं हनुमते नमः ।’ या नामजपापेक्षा ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप केल्यास अनाहतचक्राच्या ठिकाणी अधिक भावजागृती होऊन आनंदाची स्पंदने जाणवतात आणि चित्रातील तत्त्व आपल्याला प्राप्त होत असल्याचे जाणवते. सनातन-निर्मित मारुतीच्या या चित्रातील मारुती भक्तवत्सल भावामध्ये असल्यामुळे ‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपाची स्पंदने त्या चित्रातील स्पंदनांशी तंतोतंत जुळतात.’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.११.२०१८)
सूक्ष्म ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.