दैवी शक्तीला राजमान्यता मिळवून देणारे थोर शास्त्रज्ञ हॅरी एडवर्डस !

हॅरी एडवर्डस (जन्म वर्ष १८९३ आणि मृत्यू वर्ष १९७६)

हॅरी एडवर्डस (जन्म वर्ष १८९३ आणि मृत्यू वर्ष १९७६) या शास्त्रज्ञाने दैवी शक्तीला राजमान्यता मिळवून दिली. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा परिणाम होऊन इतर उत्साही शास्त्रज्ञ या उपेक्षित आणि अविश्‍वसनीय मार्गाकडे आकर्षित झाले. वर्ष १९५५ मध्ये हॅरी एडवर्डसने ‘नॅशनल फेडरेशन ऑफ स्पिरिच्युअल हिलर्स’ ही संस्था स्थापन केली. या लोकांनी केलेले सर्व प्रयोग आधुनिक वैद्य आणि शास्त्रज्ञ यांनी कसून पडताळले आहेत. या प्रयोगांचे ‘रेकॉर्ड्स’ जपून ठेवण्यात आले आहेत. हॅरीच्या या संशोधनाला वर्ष १९७७ मध्ये ब्रिटीश कौन्सिलने अखेर मान्यता दिली. ‘दैवी शक्ती’ ही वैद्यकीय शास्त्रात बसत नसल्याने वैद्यांनी स्वतःचे रुग्ण ‘स्पिरिच्युअल हिलर्स’कडे पाठवण्यास तोपर्यंत सक्त मनाई होती. हॅरीच्या अथक प्रयत्नांनी ‘ब्रिटीश मेडिकल कौन्सिल’सारख्या कर्मठ सनातनी संस्थेला स्वतःचा निर्णय पालटायला लावला.

विज्ञापनांना बळी पडू नका !

वरील लेख वाचतांना एक गोष्ट लक्षात ठेवावी. ‘रेकी’ किंवा ‘स्पिरिच्युअल हिलींग’ शिका ! ८ दिवस ते १५ दिवसांत अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण करा ! ५ सहस्र रुपये रेकी !! ‘स्पिरिच्युअल हिलींग’ ४० सहस्र रुपये ! १०-१५ दिवसांत कोर्स पूर्ण करा ! जेवणे, खाणे, रहाणे !!’ कृपया अशा विज्ञापनांना भुलू नका. आजकाल ‘कॉस्मिक हिलींग’चे फॅड आले आहे. डोळसपणे वागा. डोळे असून पट्टी बांधून गांधारी बनू नका. आम्ही शिकतांना एवढे पैसे व्यय केले. ‘आमच्या शिक्षकांनी केलेल्या उपचारांचे पैसे घेण्यास अनुमती दिली आहे’, या मायाजालात गुरफटू नका. शिकायची आवड किंवा पैसा भरपूर आहे ? तो व्यय कसा करावा ? त्यांना कोण अडवणार ?’

– डॉ. स्वरूपा कुर्डेकर

(संदर्भ : दिवाळी विशेषांक : ‘‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’’)