मनुष्याचे दुर्गुण हेच रोगव्याधींचे मूळ कारण असणे ! – रामचरितमानस, उत्तरकांड
‘काकभुशुण्डिंना पक्षीराज गरुड म्हणतात – ‘‘मानसिक रोगांमुळे मनुष्याला पुष्कळ दु:ख भोगावे लागते. सर्व रोगांचे मूळ आहे जडत्व, मोह (अज्ञान). या मानसिक व्याधीमुळे नंतर अनेक प्रकारची दुखणी उत्पन्न होतात.’’
१. शरिरात वास करणार्यावात-कफ-पित्त या त्रिदोषांच्या समतोल अवस्थेमुळे निरोगी शरिराची प्राप्ती आणि असमतोलतेमुळे विविध रोगांचा संसर्ग होणे
कामामुळे वात, लोभामुळे कफ आणि क्रोधामुळे पित्त होते. वात-कफ-पित्त यांना ‘त्रिदोष’ म्हटले आहे आणि प्रत्येकाच्या शरिरात त्यांचा वास असतो. जेव्हा ‘त्रिदोष’ शरीरात समान अवस्थेत असतात, तेव्हा ते गुण असतात; परंतु जेव्हा त्यांची अवस्था विकृत होते, तेव्हा ते दोष बनतात. जोपर्यंत ‘त्रिदोष’ शरिरात समतोल अवस्थेत असतात, तोपर्यंत शरीर निरोगी असते. जेव्हा त्यांचा समतोलपणा ढासळतो अर्थात् एका दोषाचे प्रमाण वाढते किंवा घटते, तेव्हा शरीर रोगग्रस्त होते. जेव्हा तिन्ही दोषांचे प्रमाण असमतोल होते, तेव्हा दुर्धर असा ‘सन्निपात’ रोग होतो.
२. विविध रोगांसाठी कारणीभूत असणारे मानवी दुर्गुण !
अशा प्रकारे या जगात अनेक प्रकारचे रोग आहेत. मनुष्याचा अंत एका रोगानेही होऊ शकतो. तरीही अनेक असाध्य रोग आहेत की, ज्यामुळे जिवांना सतत त्रास होतो. अशा स्थितीत शांती मिळवण्यासाठी नियम, धर्म, आचार, तप, ज्ञान, यज्ञ, जप, दान आणि अनेक प्रकारची औषधेही आहेत.’
– (संदर्भ : ‘संस्कारम्’, फेब्रुवारी २०१४)