संसार चालवायचा म्हणजे संसाररूपी रथाची चाके एका लयीत पाहिजेत ! – विश्‍वनाथ भास्कर किल्लेदार

‘धर्मांधांच्या क्रूरतेमुळेच महिलांना कसलेही संरक्षण नव्हते. त्यामुळे महिलांचे चूल आणि मूल हेच जीवन होते. सध्याच्या सुधारलेल्या जगात महिलांना पुष्कळ स्वातंत्र्य मिळाले आहे. महिलांना सर्वत्र संचार असल्यामुळे काही महिला उद्दाम बनल्या आहेत. पतीवर अधिकार गाजवतात; परंतु संसार चालवायचा म्हणजे संसाररूपी रथाची चाके एका लयीत पाहिजेत. दोघांनीही समंजसपणा दाखवून एक पाऊल मागे गेले पाहिजे. जीवनात तडजोड पाहिजे. महिला अधिक शिकल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मुलींना सासू-सासरे त्यांच्या संसारात नको असतात. त्यामुळे कुटुंबात सेवावृत्ती अल्प झाली आहे. त्या सासू-सासर्‍यांना पतीद्वारे वृद्धाश्रमात पाठवण्यासही कमी करत नाहीत. पती-पत्नीत एक निष्ठा राहिली नाही. किरकोळ कारणावरून घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. प्रसुतीच्या वेळी सासू-सासर्‍यांची आवश्यकता लागते. स्त्रियांनीच आपली संस्कृती सांभाळली आहे; परंतु सद्यस्थितीत पाश्‍चात्त्यांचा पगडा वाढतो आहे. स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नव्हे.’ (संदर्भ : ‘लोकजागर’, ८.३.२०१५)