‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ पीडितांना मद्य विकण्यावर केरळ उच्च न्यायालयाची स्थगिती
थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ (दारु पिणे थांबवल्यानंतर व्यक्तीत दिसणारी लक्षणे) या आजाराने पीडित असणार्यांना मद्य विकण्याच्या ठेवण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी स्थगिती दिली. संबंधित रुग्णांनी स्वतःला वरील आजार असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यावरच मद्य विकण्यात येणार होते. सध्या राज्यात दळणवळण बंदीमुळे मद्य विक्री बंद ठेवण्यात आली आहे.