राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकर्यांना स्वस्त धान्य उपलब्ध
नाशिक – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दळणवळण बंदी घोषित करण्यात आली असून या कालावधीत राज्यातील जनतेला मुबलक प्रमाणात आणि सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा येथील १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकर्यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या ३ मासांकरिता सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ प्रतिव्यक्ती ५ किलो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.