मुंबई ते झारखंड विनाअनुमती प्रवास करणारे १५ प्रवासी कह्यात
दळणवळण बंदी लागू करून ४-५ दिवस उलटले, तरी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन चालूच असणे, हे गंभीर आहे. पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करायला हवी !
जळगाव – देशभरात दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांनाही विनाअनुमती मुंबई ते झारखंड प्रवास करणार्या १५ प्रवाशांना जळगाव शहरातील बहिणाबाई चौकात जिल्हा पेठ पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हे प्रवासी ३ खासगी वाहनांतून जात होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता प्रवास अनुमती पत्र नसल्याचे पोलिसांना आढळून आले. या सर्वांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पडताळणी करून पुढील कार्यवाही चालू आहे.