दळणवळण बंदी असतांना बोटीने प्रवास केल्याचे प्रकरण
मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद
रत्नागिरी – दळणवळण बंदी असतांनाही उरण बंदरातून रत्नागिरी येथे समुद्रामार्गे प्रवास करणार्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेत. हे ३४ खलाशी मूळचे रत्नागिरीतील आहेत.
उरण बंदरात रहाणारे खलाशी यांना सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदी असल्यामुळे त्यांना मूळ गावी परतायला कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते; म्हणून या ३४ खलाशांनी मुंबई आणि उरणहून बोटीने रत्नागिरीपर्यंत प्रवास केला होता. रत्नागिरीतही जिल्हाबंदी असल्यामुळे ही घटना प्रशासनाच्या लक्षात आल्यावर सर्व खलाशांवर नियमभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या ३४ खलाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.