एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?
‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणी मंठा तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार वीजेंद्र फुलंब्रीकर यांच्यासह २९ जणांवर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात तहसीलदारांपासून अभियंते, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी २९ जणांचा समावेश आहे.’