‘कॉग्निझंट’ आस्थापन कर्मचार्यांना अतिरिक्त वेतन देणार
अन्य उद्योगपतींकडूनही साहाय्य घोषित
नवी देहली – माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे. ‘कॉग्निझंट’ भारतातील ‘असोसिएट’ दर्जाच्या आणि त्याखालील पदांवरील एकूण १ लाख ३० सहस्र कर्मचार्यांना एप्रिलच्या वेतनासह २५ टक्के अतिरिक्त वेतन देणार आहे.
अन्य आस्थापनांनी केलेल्या घोषणा
१. ‘रिलायन्स इंडस्ट्रिज्’ १५ सहस्र रुपयांहून अल्प वेतन असणार्या कर्मचार्यांना मासातून २ वेळा वेतन देणार.
२. भ्रमणभाष सेवा देणार्या ‘एअरटेल’ आस्थापनाने त्यांच्या कर्मचार्यांना मार्च मासाचे वेतन दिले आहे.
३. ‘टाटा समूह’ आस्थापन त्यांच्याकडे पूर्णवेळ आणि कंत्राटी पद्धतीने काम करणार्या सर्व कर्मचार्यांना मार्च अन् एप्रिल मासांचे पूर्ण वेतन देणार आहे.
उद्योगपतींनी घोषित केलेले साहाय्य
१. उद्योगपती राहुल बजाज यांनी कोरोनाशी लढण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचसमवेत कोरोनासाठी लागणारी संसाधनेही ते उपलब्ध करून देणार आहेत.
२. ‘हिरो मोटर्स’चे अध्यक्ष पंकज एम्. मुंजाल यांनी करोनाग्रस्तांसाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
३. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज्’चे मुकेश अंबानी यांनी ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’साठी ५ कोटी रुपयांचे साहाय्य केले. ‘रिलायन्स’ने मुंबईतील ‘सेव्हन हिल्स’ या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचे उपचारकेंद्र बनवले आहे.
४. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी ७ सहस्र ५०० रुपये मूल्याचे अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’ सिद्ध करण्यात येत असल्याचे घोषित केले आहे.