‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !
मुंबई – देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला. त्यानंतर ते गतप्राण झाले.