मेरा भारत महान !
इतर गुणात्मक सूत्रांमध्ये नव्हे, तर आत्महत्यांच्या संख्येत जागतिक उच्चांक गाठणारा भारत !
‘विश्वात प्रतिवर्षी होणार्या ५ लाख आत्महत्यांपैकी १ लाख म्हणजे २० टक्के आत्महत्या भारतात होतात. मागील दोन दशकांमध्ये भारतातील आत्महत्यांचा दर ७.९ वरून १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आत्महत्यांच्या जागतिक प्रमाणापेक्षा हे प्रमाण अधिक आहे.’ (‘वर्ल्डलाईफएक्स्पेकटन्सी.कॉम’ या संकेतस्थळावरून)
आत्महत्यांची भयावह आकडेवारी असणारा भारत म्हणे विकसनशील देश !
‘राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार वर्ष २०१० मध्ये देशात आत्महत्या करणार्यांच्या संख्येत विवाहितांचे प्रमाण ६९.२ टक्के, तर अविवाहितांचे प्रमाण २२.७ टक्के होते. एकूण १ लाख ३४ सहस्र ५९९ आत्महत्यांच्या घटनांमध्ये ६१ सहस्र ४५३ विवाहित पुरुष, तर ३१ सहस्र ७५४ महिलांचा समावेश आहे.’