मागील वर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी निपाणी येथील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. होळी पेटवल्यावर बहुतांश ज्वालांचा रंग नेहमीप्रमाणे पिवळा न दिसता निळा दिसणे
‘प्रतिवर्षीप्रमाणे १.३.२०१८ या होळीपौर्णिमेच्या दिवशी आम्ही घरासमोर होलिका पूजन आणि होलिका दहन केले. होलिका पूजन झाल्यावर आम्ही होळी पेटवली. तेव्हा ज्वालांचा रंग नेहमीप्रमाणे पिवळा नव्हता. पिवळा, निळा आणि लालसर गुलाबी असे रंग ज्वालांमधे दिसत होते. बहुतांश ज्वालांचा रंग निळा होता. तेथे असलेल्या सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत होते. तो सुंदर निळा रंग पाहून सर्वांना चांगले वाटत होते.
२. होळीच्या ज्वालांमध्ये आरंभी ध्यान करत असलेल्या योग्याचे दृश्य दिसणे आणि नंतर त्या ठिकाणी ज्वालांचा आकार ‘ॐ’ सारखा होणे
आम्ही त्या ज्वालांची छायाचित्रे काढली. त्यांतील एका छायाचित्रात मला ध्यानासाठी बसलेल्या एका योग्याचे दृश्य दिसले. त्याने धोतर परिधान केले होते आणि केस मोकळे सोडले होते. तो ज्वालांकडे तोंड करून बसला होता. काही कालावधीनंतर त्या योग्याच्या ठिकाणी ज्वालांचा आकार ‘ॐ’ सारखा दिसला. संपूर्ण होलिका दहन चालू असतांना मला आतून चांगले आणि सकारात्मक वाटत होते. होळीमधून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत होती.’
– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, बेळगाव. (१४.६.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक