झारखंड आणि तमिळनाडू येथील मशिदींमध्ये विदेशी मौलवी सापडले !
भारतातील बर्याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
रांची (झारखंड) – येथील एका मशिदीमधून ११ विदेशी मौलवींना कह्यात घेण्यात आले आहे, तसेच तमिळनाडूतील अंबूर येथील मशिदीमधून इंडोनेशियातील १२ आणि म्यानमारमधील ८ रोहिंग्या मौलवींना पकडण्यात आले आहे. यापूर्वी पाटलीपुत्र येथील मशिदीमधून १२ मौलवींना कह्यात घेण्यात आले होते. हे मौलवी स्थानिक पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती न देतो धर्मप्रसार करत होते.
१. रांची येथे पकडण्यात आलेले मौलवी किर्गिस्तान आणि कजाकिस्तान येथील आहेत. पोलिसांना संशय आहे की, भारतात कोरोनाचा संसर्ग पसरवण्याच्या एका आतंरराष्ट्रीय कटाचा हा भाग असू शकतो. सध्या त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांची पारपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांना आश्रय देणार्या मशिदींच्या मौलवींची चौकशी करण्यात येत आहे.
२. सहस्रो मौलवी पर्यटन व्हिसाच्या नावाखाली भारतात येतात आणि देशातील अनेक मशिदींमध्ये रहातात. हे मौलवी १० ते २० या संख्येने एखाद्या मशिदीत रहातात, जेणेकरून प्रशासनाला त्यांच्याविषयी कोणताही संशय येऊ नये. देशातील जयपूर, भोपळ, उत्तरप्रदेशातील काही शहरे आणि भाग्यनगर येथील मशिदींमध्ये अनेक विदेशी मौलवी लपून रहात आहेत, असा संशय आहे. यामागे एखादे मोठे षड्यंत्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.