बांगलादेशमध्ये बाँबस्फोट करणार्या धर्मांधास ठाणे येथे अटक
- बांगलादेशमधील आरोपी भारतात कोणत्या मार्गे आला, याची शासनाने कसून चौकशी करून त्याला कडक शिक्षा करायला हवी !
- बांगलादेशी गुन्हेगारांसाठी अड्डा झालेला भारत देश !
ठाणे – बांगलादेशमध्ये वर्ष २००२ मध्ये मशिदीमध्ये आणि मशिदीच्या बाहेर झालेल्या तीन बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी मुफज्जल हुसेन उपाख्य मोफा अली गाझी उपाख्य मफीजुल केराअली मंडल याला गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे येथून अटक केली आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या बाँबस्फोटांत १ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले होते. बाँबस्फोट प्रकरणी मुफज्जल हुसेनला बांगलादेश उच्च न्यायालयाने वर्ष २००४ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती; परंतु त्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. तेव्हापासून तो बंगालमध्ये मफीजुल केराअली मंडल असे नाव पालटून रहात होता.