सिरसाळा (जिल्हा बीड) येथे पहारा घालणार्या पोलिसांवर आक्रमण करणार्या ४ जणांवर गुन्हा नोंद
सिरसाळा (जिल्हा बीड) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वडार कॉलनी येथे पहार्यासाठी असलेल्या पोलिसांना काही नागरिक घरासमोर रस्त्यावर जमल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना संचारबंदी चालू असल्याने घरात जाण्यास सांगितले असता ‘आमच्या गल्लीत येऊन सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार ?’, असे म्हणत तेथील युवकांनी लाकूड, दगड यांनी पोलीस नाईक किशोर घटमल यांना मारहाण केली.
पोलीस नाईक घटमल यांच्या तक्रारीवरून येथील राम तुकाराम पवार, श्रीराम पवार, दत्ता देवकर, अशोक पवार, विकास मिटकर, विलास मिटकर, सोनाली पवार, अनिल जाधव यांच्या विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ (ब) आणि भारतीय दंड विधान संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा ‘व्हिडीओ’ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे