यवतमाळ येथे वादळी वार्यासह पाऊस !
कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची भीती
यवतमाळ, २६ मार्च (वार्ता.) – गेले ३ ते ४ दिवस जिल्ह्यात कडक ऊन तापत असतांना २५ मार्च या दिवशी रात्री शहरासह जिल्ह्यात वादळी वार्यासह पाऊस पडला. या पावसामुळे उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. या वेळी विजा कडाडल्या, त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये पालट होऊन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने परिसरातील खासगी छोटी रुग्णालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच अत्यावश्यक सेवा सोडून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे.