५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील ही एक आहे !
‘चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, गुढीपाडवा (२४.३.२०२०) या दिवशी कु. चैतन्या भूपेंद्र पाटील हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. चैतन्या पाटील हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात खालील प्रकारची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘चैतन्याच्या जन्मापूर्वी मला अनेक वेळा संतांच्या सेवेची संधी मिळाली. चैतन्या गर्भात असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे ठाण्याला प्रक्रिया सत्संग घेत असत. त्या वेळी चैतन्याची हालचाल पुष्कळ वाढत असे. चैतन्याच्या जन्मापूर्वी मला ‘पुष्कळ सेवा करावी’, असे वाटायचे. त्यामुळे ‘हे बाळ सात्त्विक असेल’, असे मला नेहमी वाटायचे.
आ. चैतन्या पोटात असतांना जप करणे, ध्यानाला बसणे, स्तोत्र ऐकणे, हे मला आवडत असे, तसेच मला ‘सेवेतच रहावे’, असे वाटायचे. या काळात मला अधिकाधिक वेळा सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा सत्संग लाभला.
२. जन्मानंतर
कु. चैतन्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दर्शन पुस्तिका पुष्कळ आवडते. ती पुष्कळ वेळा दर्शन पुस्तिकेतील छायाचित्रांकडे पहात असते. मला राग आला किंवा मी चिडचिड केली, तर चैतन्या मला ‘श्रीकृष्ण बघत आहे’, अशी जाणीव करून द्यायची आणि शांत रहाण्यास सांगायची.
३. दुसरा आणि तिसरा मास
अ. ‘चैतन्याचे नाव काय ठेवायचे ?’ यावरून आमच्याकडे पुष्कळ चर्चा चालू होती. मी चैतन्याला घेऊन भिवंडी येथील गुरुपौर्णिमेला गेले होते. त्या वेळी चैतन्याच्या चेहर्यावर चैतन्यकण (दैवी कण) पाहून साधक तिला ‘चैतन्या’ म्हणू लागले आणि तिचे नामकरण झाले.
आ. तिसर्या मासापासून चैतन्याला घेऊन मी सेवेला जाते. तिच्या झोपेच्या आणि खेळाच्या वेळेतही ती माझ्या समवेत असते.
इ. सेवेच्या ठिकाणी ती शांतपणे खेळते. घरी आल्यावर ती ‘गुरुदेव, गुरुदेव’ असे बोलते. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर चैतन्य कण दिसतात.
४. वय ५ ते ७ वर्षे
अ. घरातील देवघराजवळ खेळतांना तिला उदबत्ती आणि कापूर पुष्कळ आवडतो. गणेशोत्सव काळात ती घरात गणपतीच्या सात्त्विक मूर्तीजवळ जाऊन देवाशी बोलत असते. तिला ३ वर्षांपर्यंत व्यवस्थित बोलता येत नव्हते; पण आमच्याकडे असणार्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमवेत ती बोलत असे.
आ. संध्याकाळी खेळण्याच्या वेळात ती माझ्या समवेत सेवेत असायची, तरी तिची काही तक्रार नसायची.
इ. तिचा स्वभाव प्रेमळ आहे. संतांच्या सत्संगात ती आनंदी असते. ती स्वतःहून सगळ्यांशी बोलते आणि घरी कुणी साधक रहाण्यास आले की, तिला पुष्कळ आनंद होतो.
ई. ती आजोबांच्या समवेत माळ घेऊन नामजप करते. ती माळ घेऊन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ असा नामजप करते आणि तशीच झोपी जाते.
उ. मी घरी सेवा करत असतांना सेवा झाल्यावर वस्तू जागेवर ठेवल्या नाहीत, तर ती मला जाणीव करून देते.
ऊ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या सत्संगाला जाऊन आल्यावर तिच्या चेहर्यावर चैतन्यकण दिसतात.
५. आध्यात्मिक त्रास
चैतन्या पुष्कळ उशिरा बोलायला लागली. वयाच्या तिसर्या वर्षी तिला थोडे थोडे शब्द बोलता यायला लागले.
६. स्वभावदोष
हट्ट करणे, चंचलता आणि लक्षपूर्वक कृती न करणे
गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला हे लिखाण करता आले. याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नीलिमा पाटील (चैतन्याची आई), ठाणे (१०.३.२०२०)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक