वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या विज्ञानाच्या मर्यादा !
पर्यावरणाच्या समस्यांची मूळ कारणे स्वार्थ, हाव आणि उदासीनता ही असून त्यांच्या निर्मूलनासाठी सांस्कृतिक अन् आध्यात्मिक परिवर्तनाची आवश्यकता ! – जेम्स गस्टाव्ह स्पेथ, अमेरिकन एन्व्हाइर्न्मेंटल् लॉयर अँड अॅडव्होकेट : ‘वनस्पती आणि प्राणी जीवनातील विविधतेचा र्हास, पर्यावरण व्यवस्था कोलमडणे (पर्यावरण व्यवस्थेतील असमतोलता) आणि हवामानातील पालट ही पर्यावरणीय समस्यांची प्रमुख कारणे आहेत. मला वाटत होते की, विज्ञानाच्या आधारे ३० वर्षे चांगले प्रयत्न केल्यास या समस्यांचे निराकरण होऊ शकेल; परंतु ते खोटे ठरले. प्रत्यक्षात ‘स्वार्थ, हाव आणि उदासीनता’ ही पर्यावरणाच्या समस्यांची मूळ कारणे आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाची आवश्यकता आहे; मात्र ‘ते परिवर्तन कसे करायचे ?’, हे आम्हा वैज्ञानिकांना ठाऊक नाही.’
– जेम्स गस्टाव्ह स्पेथ, अमेरिकन एन्व्हाइर्न्मेंटल् लॉयर अँड अॅडव्होकेट