श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।
सद्गुरु बिंदाई अन् सद्गुरु अंजलीताई (टीप १)।
असे आपल्या भूतलावरील वैकुंठातील गौराई ॥ १ ॥
एक असे लक्ष्मीरूप अन् एक असे सरस्वतीस्वरूप ।
एक गौराई आश्रमनिवासी अन् एक करीतसे ब्रह्मांड भ्रमंती ॥ २ ॥
या गौराईस्तव समतोल साधिती सर्वलोकी ।
एक गौराई यज्ञ-यागातुनी चैतन्य पसरवती ॥ ३ ॥
अन् एक गौराई साधकांस ब्रह्मांडातील चैतन्य देती ।
दोन्ही गौराई आहेत हिंदु राष्ट्राची प्रतिकृती ॥ ४ ॥
म्हणूनच श्रीगुरु या गौराईंप्रती निश्चिंत असती ।
किती जन्माचे भाग्य आम्हा लाभले ॥ ५ ॥
श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।
जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव ॥ ६ ॥
टीप १ – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
– सौ. सुनीता पंचाक्षरी, आंबाजोगाई (२६.२.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक