पू. पद्माकर होनप यांच्याशी बोलल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती
‘३१.७.२०१९ या दिवशी मी संध्याकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या सर्वांगाला कंड येत होती. माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता; म्हणून मी उठून बाहेर आले. तेव्हा पू. पद्माकर होनपकाका शतपावली करत होते. मी त्यांच्याशी बोलू लागले. तेव्हा पू. होनपकाका मला म्हणाले, ‘‘आकाशात इंद्रधनुष्य आले आहे.’’
त्या वेळी मला इंद्रधनुष्यात मोर आणि त्याचा पूर्ण फुललेला पिसारा दिसला. पू. होनपकाकांतील चैतन्यामुळे माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला आणि मला येणारी कंड न्यून झाली.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे क्षणोक्षणी आमची काळजी घेतली जाऊन पूजनीय संतांच्या माध्यमातून आम्हाला चैतन्य आणि आनंद मिळतो, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक