रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना साधकांना होणारा दुहेरी आध्यात्मिक लाभ
‘चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२७ मार्च २०२०) या दिवशी सनातनचे पू. पद्माकर होनप यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पू. पद्माकर होनप यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना आणि नसतांना कसे जाणवते ? संत नसतांनाही या खोलीमधून कशा प्रकारे आध्यात्मिक लाभ मिळतो आणि संत आल्यामुळे खोलीत काय पालट होतो ?’ असा प्रश्न पू. होनपकाका यांनी सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना विचारला. त्यानंतर कु. मधुरा भोसले यांना देवाने सुचवलेले उत्तर पुढे देत आहोत.
१. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिर
ध्यानमंदिरामध्ये विविध देवतांची सात्त्विक चित्रे आणि मूर्ती आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात देवतांचे तत्त्व कार्यरत झालेले आहे. त्यामुळे ध्यानमंदिरामध्ये सगुण-निर्गुण स्तरावर आध्यात्मिक लाभ होतात.
२. आश्रमातील खोली
या खोलीमध्ये पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी काही मास वास्तव्य केले होते. त्यामुळे या खोलीमध्ये निर्गुण चैतन्य कार्यरत झाले आहे. या खोलीमध्ये बसल्यावर साधकांवर निर्गुण-सगुण स्तरावर आध्यात्मिक लाभ होतात.
३. याच खोलीत संतांनी नामजपादी उपाय करणे
संत आल्यामुळे त्यांच्याकडून सगुण-निर्गुण स्तरावर आवश्यक त्या देवतेचे तत्त्व आणि चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होऊ लागते. अशा प्रकारे जेव्हा संत या खोलीमध्ये नामजपादी उपाय करतात, तेव्हा त्यांच्याकडून सगुण-निर्गुण आणि खोलीतून निर्गुण-सगुण या स्तरांवर साधकांच्या दिशेने चैतन्याचे प्रक्षेपण होऊन त्यांना आध्यात्मिक लाभ होतात. अशा प्रकारे परात्पर गुरु पूर्वी रहात असलेल्या खोलीमध्ये जेव्हा साधक संतांच्या समवेत नामजप करतात, तेव्हा त्यांना सगुण-निर्गुण आणि निर्गुण-सगुण या दोन्ही स्तरांवरील आध्यात्मिक लाभ होतो.
कृतज्ञता
‘परात्पर गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे आम्हाला सनातनच्या सात्त्विक आश्रमामध्ये रहाण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. त्याचप्रमाणे आम्हाला अनेक संतांचे नित्य दर्शन आणि मार्गदर्शन होण्यासह त्यांनी केलेल्या नामजपादी उपायांचाही लाभ होऊन आमचे जन्मोजन्मींचे आध्यात्मिक त्रास दूर होत आहेत’, यासाठी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.