देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती
नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्या वाहतुकीलाच अनुमती आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना ठरलेल्या ठिकाणी पोचावीत, यासाठी भारतात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुली (टोलनाक्यावरील वसुली) स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘ट्वीट’ करून दिली.