नागठाणे (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीच्या वतीने बाहेरून आलेल्यांची थेट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणी
सातारा, २६ मार्च (वार्ता.) – मुंबई आणि पुणे येथून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने २२ सहस्रांहून अधिक नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागठाणे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात येणार्या व्यक्ती कोण-कोण आहेत, हे पाहून त्यांच्या आरोग्य पडताळणीसाठी त्यांना थेट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात येत आहे. तसेच नागठाणे ग्रामस्थांनी कोणत्याही नवीन व्यक्तीस गावात पाऊल ठेवण्यास प्रतिबंध केला आहे.