पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत
पुणे – जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. दिवसा ५, तर रात्री २ कर्मचारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये जाणे, तातडीने विमानतळावर जाणे, गंभीर आजार आणि अन्य तातडीच्या प्रसंगांमध्ये घराबाहेर पडावे लागल्यास ९१४५००३१००, ८९७५२८३१००, ९१६८००३१०० किंवा ८९७५९५३१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर येणार्या तक्रारींची नोंद घेऊन त्याचे निवारण केले जात आहे.