कोरोनाचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटनेचे अनुमान
जिनिव्हा – अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत युरोपपेक्षा अमेरिकेत अधिक रुग्ण आढळून येतील, असे अनुमान जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे. यासंबंधीचे वृत्त येथील वृत्तपत्र ‘रॉयटर्स’ आणि ‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
संघटनेच्या प्रवक्त्या मार्ग्रेट हॅरिस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, कोरोना चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची जी नवीन आकडेवारी समोर येत आहे, त्यात ८५ टक्के प्रकरणे युरोप आणि अमेरिका येथील आहेत. अमेरिकेत एकाच दिवसात १० सहस्र रुग्ण आढळले आहेत.