कोरोनापासून लहान मुलेही सुरक्षित नाहीत ! – जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी
वॉशिंग्टन – चीनमध्ये कोरोनामुळे १४ वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिकेत १२ वर्षांची एक मुलगी ‘व्हेंटिलेटर’वर आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील त्या मुलीने कुठेच प्रवास केलेला नाही आणि ती संसर्ग झालेल्या व्यक्तींच्याही संपर्कात आलेली नाही.
या दोन्ही घटनांवरून जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी देतांना म्हटले आहे की, मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. मुलांमधील कोरोनाचा संसर्ग भविष्यात अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकतो. यामुळे पालकांना त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कोरोनापासून कुणीच सुरक्षित नसून सर्वांनी सावधानता बाळगायला हवी.