देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ
नवी देहली – देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे. गहू आणि तांदूळ यांविषयी देशाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. देशातील प्रत्येक भागांत पुरवठा केला जाईल, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष डी.व्ही. प्रसाद यांनी दिली. भारतियांनी धान्याविषयी चिंता करू नये, असेच यातून त्यांनी सूचित केले आहे.