२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

नवी देहली – कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतात २१ दिवसांची दळणवळण बंदी घोषित केल्यामुळे हे कौतुक करण्यात आले आहे. तत्पूर्वी अमेरिकेनेही भारताच्या ‘जनता कर्फ्यू’चे कौतुक केले होते. जगभरातील १६५ देशांमध्ये ४ लाख २२ सहस्र ९०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या देशांपासून धडा घेऊन केलेल्या उपाययोजनांमुळे भारतात रुग्ण संख्येचा आकडा अल्प आहे.