सैदापूर (गाजीपूर, वाराणसी) येथील सौ. प्रतिभा पांडेय यांना आलेल्या अनुभूती
१. साधनेतील अडचणी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगण्याचा विचार मनात येणे आणि त्यानंतर ‘मनातील सर्व विचार परात्पर गुरुदेवापर्यंत पोचत आहेत अन् तेही सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अडचणी सांगण्यास सांगत आहात’, असे जाणवणे : ‘मी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना माझ्या साधनेत अडथळा आणणार्या माझ्या मनाच्या अडचणी सांगू इच्छिते. मी माझ्या मनातील सर्व विचार सूक्ष्मातून तुम्हाला सांगतच असते आणि तुम्ही तर सर्व जाणताच. आज सकाळी ‘माझ्या मनातील सर्व विचार आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि तुम्ही मला ते सर्व विचार सद्गुरु बिंदाताईंना सांगण्यास सांगत आहात’, असे मला जाणवले. त्यानंतर मी निश्चिंत झाले.
– सौ. प्रतिभा पांडेय, सैदापूर, गाजीपूर, वाराणसी. (२९.३.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.