भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टरांसम गुरु ।
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून मोक्ष पथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥
त्यांनी दिली आम्हास सूक्ष्मातील दिव्य दृष्टी ।
सांगितली अनमोल साधना व्यष्टी आणि समष्टी ॥ २ ॥
निर्माण केले आध्यात्मिक ‘सनातन प्रभात’ वर्तमानपत्र ।
अनेक धार्मिक ग्रंथ लिहून शिकवले जीवनाचे सूत्र ॥ ३ ॥
तळमळ त्यांची किती प्रत्येक साधक व्हावा आनंदी ।
गुरुकृपायोगातून दिली जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका अन् मोक्षाची हमी ॥ ४ ॥
गुरुदेवा, देवाप्रती श्रद्धा, भाव-भक्ती तुम्हीच शिकवली ।
नामजपाने देवाची शक्ती तुम्हीच साधकांना दाखवली ॥ ५ ॥
गुरुविना शक्य नाही घडणे देवाचा साक्षात्कार ।
म्हणून आम्ही करतो गुरुदेवांच्या चरणी नमस्कार ॥ ६ ॥
– सौ. योगिता विनायक महामुनी, कराड, सातारा. (१४.२.२०१९)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.