मुसलमानांनी दळणवळण टाळून घरातच नमाजपठण करावे !
बिहारमधील मुसलमान संघटनांकडून आवाहन
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन १५ दिवस उलटल्यानंतर आणि तेही केवळ बिहारमधील मुसलमान संघटना असे आवाहन करत आहेत. मुळात देशातील सर्व मशिदी आणि मदरसे बंद करण्यात आले पाहिजे होते, तसे करण्यात आलेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे !
पाटलीपुत्र (बिहार) – सध्याची स्थिती पहाता मशिदीमध्ये केवळ ४-५ जणांनीच जाऊन नमाजपठण करावे, तर उर्वरित मुसलमानांनी घरामध्येच नमाजपठण करावे, असे आवाहन बिहारमधील मुसलमानांच्या काही धार्मिक संघटनांनी केले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इमारत-ए-शरिया, फुलवारीशरीफ शरिया, काउंसिल, जमाएत-ए- इस्लामी हिंद आणि बिहार सुन्नी वक्फ बोर्ड यांनी हे आवाहन केले आहे. ‘मुसलमानांनी एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवावे. हस्तांदोलन करणे किंवा आलिंगन देणे टाळावे. मशिदीची स्वच्छता करावी. तसेच कार्पेट आणि चटई यांवर नमाजपठण करावे’, आदी आवाहन करण्यात आले आहे.