पाटलीपुत्र येथे मशिदीमध्ये रहात असलेले १२ विदेशी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

वैद्यकीय तपासणी न करता राज्यात करत होते धर्मप्रसार !

देशातील आणखी किती मशिदींमध्ये असे कुणी रहात आहेत का ? याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे ! मुळात असे विदेशी येथे रहातात याची माहिती पोलिसांना का मिळत नाही ? असे जिहादी आतंकवादी येऊन घातपात करू लागल्यास त्याला कोण उत्तरदायी असणार ?

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या पाटलीपुत्र या राजधानीमधील एका मशिदीमध्ये  विदेशी मुसलमान असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा मारून १२ विदेशी मुसलमानांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण १२ मार्च या दिवशी येथे पोचले होते; मात्र त्याविषयीची कोणतीच कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती. या लोकांची वैद्यकीय तपासणीही झाली नव्हती. हे या मशिदीमध्ये राहून बिहारमध्ये धर्मप्रसार करत होते. स्थानिक लोकांना याविषयीची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. हे मुसलमान तुर्कस्थानमधील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ते चीनमधील उघुर मुसलमान असल्याचेही नाकारता येणार नाही, असेही म्हटले जात आहे. या सर्वांकडे व्हिजा आणि पारपत्र आहेत.