दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनदात्यांना विनम्र आवाहन !
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन २३ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी आवृत्तींची छपाई होऊ शकणार नाही.
२५ मार्च या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुंबई आवृत्ती, पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती, तसेच रत्नागिरी आवृत्ती यांनी गुढीपाडवा रंगीत विशेषांक काढण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी विज्ञापनदात्यांकडून विज्ञापनेही घेण्यात आली होती; मात्र आता ‘सनातन प्रभात’ची छपाई होणार नसल्यामुळे ही विज्ञापने वरील कालावधीत प्रसिद्ध करता येणार नाहीत. असे असतांनाही बहुतांश विज्ञापनदात्यांनी ही विज्ञापने पुढील विशेषांकात प्रसिद्ध करण्याविषयी आम्हाला कळवले आहे.
अनेक वर्षे ‘सनातन प्रभात’ आणि विज्ञापनदाते यांच्यात स्नेह निर्माण झाला आहे. त्यामुळे या अडचणीच्या वेळीही विज्ञापनदात्यांनी ‘सनातन प्रभात’वर विश्वास दाखवला. याविषयी विज्ञापनदात्यांचे आम्ही ऋणी आहोत. यापुढेही विज्ञापनदात्यांचे असेच सहकार्य आणि प्रेम लाभावे, ही विनंती !
– संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह