आयात रखडल्याने वाहन उद्योग अडचणीत येणार
कोरोनामुळे उद्योग आणि चित्रपटसृष्टी यांना मोठा फटका
संभाजीनगर – कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसणार आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे ३० ते ४० टक्के सुटे भाग चीनहून आयात होतात; मात्र चीनमध्ये उत्पादनावर मर्यादा आल्याने, तसेच आयात थांबल्याने वाहन उद्योगावर संकट निर्माण होणार आहे. ज्या आस्थापनांचे सुटे भाग चीनवर अवलंबून आहे, त्यांना याचा अधिक फटका बसेल. आस्थापनांकडे २-३ मासांचा साठा असतो. त्यामुळे हानी लगेच दिसणार नाही. चीनहून जहाजाद्वारे नवीन माल येण्यास दीड-दोन मास लागतात; मात्र आता ही वाहतूकही बंद केल्यामुळे याचे परिणाम ३-४ मासांनी जाणवू लागतील, तसेच चित्रपटसृष्टी आणि पर्यटन व्यवसायही कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे, अशी माहिती उद्योजकांची संघटना सी.एम्.आय.ए.चे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.