पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ करू शकत नाही ! – इम्रान खान
पाक कोरोनाशी लढण्यास कुठल्याही पातळीवर सक्षम नाही आणि हे पाकिस्तानी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आतातरी पाकला आणि त्यांच्या जिहाद्यांना त्यांनी देशाची कोणती प्रगती केली, हे लक्षात आले असेल, अशीही अपेक्षा करता येणार नाही !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पूर्ण ‘लॉकडाऊन’ करणे म्हणजे संचारबंदी लागू करणे. लोकांना बलपूर्वक घरात रहाण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ६८६ वर पोचली आहे.