‘अपनी पार्टी’ परकीच !
संपादकीय
काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. ‘काश्मीरचा विकास करण्यासाठी, तेथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि मुख्य म्हणजे केंद्र सरकार अन् काश्मीर सरकार यांच्यातील दरी न्यून करण्यासाठी हा नवीन पक्ष काम करील’, अशी बुखारी यांनी घोषणा केली आहे. काश्मीरमध्ये स्थापन झालेल्या नवीन राजकीय पक्षाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. या पक्षाविषयी २ मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहानुसार पक्षात सहभागी झालेल्या नेत्यांची नावे पहाता, या पक्षाकडून काही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. या मताकडे दुर्लक्षून चालणार नाही; कारण या पक्षात पीडीपी, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा भरणा आहे. या सर्वच पक्षांतील नेत्यांचे काश्मीरविषयीची आणि त्याहून पुढे जाऊन काश्मिरी हिंदूंविषयीची मते सर्वज्ञात आहेत. त्यामुळे पुढे-मागे हा पक्ष काश्मीरमध्ये सत्तेत आला, तर तेथील परिस्थितीत फारसा काही पालट होणार नाही. पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची विचारसरणी राष्ट्रघातकी आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये पूर्वी कार्यरत असलेले आणि आता नव्या पक्षात आलेल्या या मंडळींकडून वेगळे अपेक्षित नाही. दुसरा मतप्रवाह ‘अपनी पार्टी’ला वेगळ्या दृष्टीकोनातून पहातो. त्यांच्यामते हा पक्ष भाजपधार्जिणा आहे. काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर खोर्यांतील सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्याचा निषेध केला होता; मात्र बुखारी यांनी त्याविषयी वक्तव्य करणे टाळले. त्यानंतर केंद्र सरकारने तेथे संचारबंदी लागू केली होती. त्याविषयीही बुखारी काही बोलले नाहीत. काश्मीरमधील अनेक राजकीय नेते सध्या नजरकैदेत आहे, बुखारी सोडून ! पक्ष स्थापन करण्याआधीही बुखारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले होते. त्यामुळे बुखारी यांच्यावर ‘भाजपचे पिल्लू’ अशी टीका होत आहे. केंद्र सरकारचे काश्मीरविषयीचे एक विशिष्ट धोरण आहे. त्यासाठी त्याला राज्यात ‘त्यांचा माणूस’ सत्तेवर येणे आवश्यक आहे. ‘बुखारी ‘ते’ असू शकतात’, असे काहींचे म्हणणे आहे. आता ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ काश्मीरमध्ये काय प्रकाश पाडते, ते येणारा काळच सांगेल. काश्मीरमध्ये एका नव्या पक्षाच्या स्थापनेकडे हिंदुहित आणि राष्ट्रहित या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे; कारण काश्मीरमध्ये राष्ट्रप्रेमी आणि तेथील हिंदूंचे हित साधणारे सरकार सत्तेवर आले, तरच ते राष्ट्राच्या हिताचे ठरील.
बुखारी आणि बक्षी !
बक्षी गुलाम महंमद हे वर्ष १९५३ ते १९६४ या कालावधीत काश्मीरचे ‘पंतप्रधान’ होते. वर्ष १९५३ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे शेख अब्दुल्ला यांना अटक झाली. पक्षात राहून शेख अब्दुल्ला यांच्या विरोधी कारवाया करणार्यांमध्ये बक्षी होते. त्या काळी काश्मीरमध्ये मुख्यमंत्री नव्हता, तर तेथील प्रमुखांचा ‘पंतप्रधान’ म्हणून ओळखले जात असे. बक्षी काश्मीरचे ‘पंतप्रधान’ झाल्यावर त्यांनी ‘नया कश्मीर’ ही संकल्पना राबवली. बक्षी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यांचे एकच घोषवाक्य होते ‘केंद्राशी जुळवून घ्या आणि काश्मीरवर सत्ता गाजवा !’ बुखारी हे बक्षी यांच्या याच घोषवाक्यानुसार काश्मीरमध्ये कार्य करू पहात आहेत. काश्मीरमध्ये आलटून पालटून २ राजकीय घराणी सत्तेत येतात. एक म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष आणि फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष. हे दोन्ही पक्ष पाकप्रेमी आहेत आणि हे पाकप्रेम व्यक्त करतांना ते जराही कचरत नाहीत. हे पाकप्रेम पाहून सामान्य राष्ट्रप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात जाते; मात्र काश्मिरी धर्मांध जनतेला त्याचे काहीच वाटत नाही. उलट या दोन्ही पक्षांपैकी जो पक्ष पाकविषयी अधिकाधिक प्रेम व्यक्त करतो, तो सत्तेपर्यंत पोचतो. ‘काश्मीरच्या लोकांना हिंसाचार नको, शांतता हवी आहे’, ‘काश्मिरी युवकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नोकरी करायची आहे’, अशी वक्तव्ये राजकीय व्यक्तींकडून आपण नेहमीच ऐकतो; मात्र ही शुद्ध धूळफेक आहे. बहुतांश धर्मांध काश्मिरींना भारतासमवेत रहायचे नसून त्यांना पाक ‘प्यारा’ आहे, हिच वस्तूस्थिती आहे. त्यामुळे पाकचे गुणगान करणारा पक्षच त्यांना काश्मीरमध्ये सत्तेत हवा असतो. हे सत्य लक्षात घेता ‘अपनी पार्टी’चे भविष्य काय असेल, हे आपल्या लक्षात येईल. सध्या तरी ‘विकास’, ‘केंद्राशी सौहार्द संबंध’, या सूत्रांवरून बुखारी सत्तेवर येणे शक्य नाही. मग ते पाकप्रेमाचा राग आळवणार कि वेगळा मार्ग धुंडाळणार, हे पहावे लागेल.
‘अपनी पार्टी’ राष्ट्रहित जोपासणार ?
काश्मीरमध्ये कोणताही पक्ष सत्तेवर आला, तरी ‘काश्मिरी हिंदूंचा वनवास संपेल का ?’, हा मूळ प्रश्न आहे. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी पूर्वी भाजपने पीडीपीशी संधान साधत तेथे सत्ता स्थापन केली; मात्र त्याचा काय परिणाम झाला ? काश्मीरमध्ये राष्ट्रहितार्थी पक्ष सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणे, यात चूक असे काहीच नाही; मात्र त्यासाठी ज्यांना जवळ करणार आहोत, ते त्या पात्रतेचे आहेत का ?, याविषयी भाजपने पडताळणी करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे.
काश्मीर धर्मांधबहुल असल्यामुळे तेथे राष्ट्रहितार्थ मंडळींना कार्य करणे कठीण जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या कितीही प्रयत्न केले, तरी त्याचे परिणाम निराशाजनकच असतात. त्यामुळे काश्मीर भारताशी खर्या अर्थाने जोडला जाण्यासाठी तेथे सामाजिक आणि राजकीय स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी काय प्रयत्न करणार, याचा उल्लेख ‘अपनी पार्टी’ने केलेला नाही किंवा तसे करणे पद्धतशीरपणे टाळले आहे. एकंदरीत ‘अपनी पार्टी’कडून काही तरी राष्ट्रहितार्थ निर्णय घेण्याची अपेक्षा करून तिच्याशी ‘आपुलकी’ दाखवणे सध्या तरी हास्यास्पद ठरेल. या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थापना म्हणजे एक राजकीय घडामोड समजून त्याला फार महत्त्व न देणेच इष्ट !
भारताचे खरे आणि नकली अल्पसंख्यांक
१. खरे अल्पसंख्यांक
अ. जैन : सर्वांत श्रीमंत; परंतु शांत आणि १०० टक्के साक्षर
आ. पारशी : श्रीमंत आणि १०० टक्के साक्षर
इ. शीख : सैन्यामध्ये यांचा १५ टक्के सहभाग, ८० टक्के साक्षर आणि परिश्रमी
२. नकली अल्पसंख्यांक
भारतातील नकली अल्पसंख्यांक हे देशाची सर्वांत मोठी समस्या असलेल्या लोकसंख्येमध्ये अंधाधुंदपणाने वाढ करण्यात मग्न आहेत. ७० वर्षांनंतरही ७० टक्के निरक्षर असलेले, ८० टक्के गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले, फुटीरतावाद्यांमध्ये ९० टक्के यांचाच सहभाग आणि लोकसंख्येत २० टक्क्यांचे प्रमाण असूनही भारतातील एकूण आयकरापैकी १ टक्का आयकरही न भरणारे, अशी त्यांची अन्य काही वैशिष्ट्ये होत.
कटू असले, तरी सत्यच !!!
संदर्भ : अज्ञात